⚡मालवण ता.०९-:
वैदेही पाटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वैदेही पुरस्कार यावेळी ‘अर्ज’ संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मंजुळा शिंत्र यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण (ना. ग. गोरे सभागृह) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अन्याय रहित जिंदगी संस्थेचे संचालक अरुण पांडे तसेव मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर उपस्थित राहणार आहेत. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप आहे. उपस्थित राहवे, असे आवाहन अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर कोषाध्यक्ष शैलेश खाडाळकर यांनी केले आहे.
