नवज्योत गावडे वेंगुर्ला एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी आगारातील समस्या तसेच प्रवासी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या समस्यांबाबत कार्यवाही करणार असल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले. याप्रसंगी सेवाशक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाचे वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपाध्यक्ष भाऊ सावळ, मिलिंद मयेकर, वैभव मांजरेकर, नांदोसकर, श्री.मचे, विभागीय सचिव भरत चव्हाण, सहसचिव स्वप्निल रजपूत आदी उपस्थित होते.
फोटोओळी – प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे स्वागत करण्यात आले.

You cannot copy content of this page