सातवा वेतन आयोग ; सिंधुदुर्गातील शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्याच्या आशा पल्लवित…

कोल्हापूर सर्किट बेंचच्या एकाच वेळी चार सचिवांना करणे दाखवा नोटीसा..

कुडाळ : सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करताना झालेली त्रुटी निवारण करण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी ऍड बालाजी शिंदे यांचेमार्फत कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची १ डिसेंबर रोजी कोल्हापूर सर्किट बेच येथे सुनावणी होऊन मा. न्यायालयाने शिक्षण विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभागाचे सर्व सचिव तसेच वेतन त्रुटी समितीच्या सदस्यांनाही या शिक्षकांची वेतन त्रुटी का दूर केली नाही याबाबत खुलासा सादर करावा अशी नोटीस काढली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.
सातव्या वेतन आयोगामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतननिश्चिती करताना झालेली त्रुटी निवारण करण्याकरिता प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्रातील तिन्ही उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केल्या होत्या. राज्यातून सुमारे ४ हजार ५०० शिक्षक या याचिकांमध्ये सामील झाले होते. मा. न्यायालयाने शासनाला वेतनत्रुटी समिती स्थापन करून वेतन त्रुटी ३० जून २०२३ पर्यंत दूर करण्याचे आदेश दिले होते. मात्र विहित वेळेत वेतनत्रुटी दूर केली नसल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी ऍड बालाजी शिंदे यांचेमार्फत कोल्हापूर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे.
या याचिकेची दि. १ डिसेंबर २०२५रोजी कोल्हापूर येथे सुनावणी करिता निघाली. मा. न्यायालयाने शिक्षण विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभागाचे सर्व सचिव तसेच वेतन त्रुटी समितीच्या सदस्यांनाही या शिक्षकांची वेतन त्रुटी का दूर केली नाही याबाबत खुलासा सादर करावा अशी नोटीस काढली आहे. एकाच वेळी चार-चार मुख्य सचिवांना अवमान याचिकेत नोटीस काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या सिंधुदुर्गातील शिक्षकांची वेतन त्रुटी दूर होण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. तसेच दि. १५डिसेंबर २०२५रोजी याची पुढील सुनावणी लगेच होणार असल्याची माहिती संतोष वारंग यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page