नुकसान भरपाई पंचनामे करण्यास सुरुवात:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार..
⚡कुडाळ ता.०९-: शहरात माकडांच्या होत असलेल्या उपद्रवाबाबत वनविभाग ऍक्शन मोड वर आला आहे. आज शहरात काही ठिकाणी माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. तसेच माकडांमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा वन विभागामार्फ़त करण्यात आला. यासाठी कुडाळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि युवासेना यांनी वनविभागाकडे पाठपुरावा केला होता.
कुडाळ शहरात विविध ठिकाणी माकडामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल वनविभागाची कुडाळ शहर शिवसेना व युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भेट घेण्यात आली होती. त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर वनविभाग ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्यात आज प्रामुख्याने कुडाळ कुंभारवाडी येथे माकडांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. त्याचप्रकारे कुडाळ शहरात ज्या शेतकऱ्यांचे माकडांमुळे नुकसान झाले त्यांचा पंचनामा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.
यावेळी मंदार शिरसाट, अमित राणे, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, दर्शन कुंभार, मयूर पाल्येकर, सुरेश कुंभार, मेहताब शहा, अनिल गावडे (वन विभाग), सुशांत करंगूटकर (वन विभाग), लक्ष्मण सावंत, योगेश पवार, नाना कुंभार, बंड्या कुंभार, दाजी कुंभार व नागरिक उपस्थित होते.
याच प्रकारे माकड बाधित क्षेत्र असलेले कवीलकट्टा, सांगिरडेवाडी, वरची कुंभारवाडी व पुढे शहरात इतर ठिकाणी देखील माकड पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार आहेत अशी माहिती नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी दिली.
