⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव-जोशी-मांजरेकर वाडी येथील येथील महापुरुष देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार ९ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त महापुरुष देवाची पूजा, देवाला केळी नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री उशिरा खानोली येथील खानोलकर दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव जोशी-मांजरेकर वाडी ग्रामस्थांनी केले आहे.
मळगाव येथील महापुरुष देवाचा उद्या वार्षिक जत्रोत्सव…
