मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची २० डिसेंबर रोजी संयुक्त आढावा बैठक…

बैठकीत स्नेह मेळाव्याच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा

⚡सावंतवाडी ता.०८-: मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व माजी विद्यार्थी यांची संयुक्त आढावा बैठक शनिवार २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता मळगाव इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्नेह मेळाव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
माजी विद्यार्थी यांचा २८ डिसेंबर रोजी ‘स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार कार्यकारिणी मंडळ व निमंत्रित माजी विद्यार्थी यांची संयुक्त बैठक काल रविवारी मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, सहसचिव समीर परब, खजिनदार अर्जुन देवळी, माजी शिक्षक दिवाकर राऊळ, बाळकृष्ण मुळीक, गुरुनाथ नार्वेकर, हरीश नार्वेकर, अंतोंन फर्नांडिस, माजी विद्यार्थी आनंद देवळी, पत्रकार सचिन रेडकर, विवेक नार्वेकर, गजानन राऊळ, सतीश राऊळ व इतर उपस्थित होते. या संयुक्त आढावा बैठकीमध्ये स्नेहमेळावा कामी समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या स्नेहमेळाव्याच्या नियोजनाबाबत अजूनही सविस्तर चर्चा करून निर्यान घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यकारणी मंडळ सर्व पदाधिकारी/सदस्य माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन म माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page