⚡वेंगुर्ला ता.०८-: झाराप केंद्रात आयोजित “बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत झाराप-कामळेवीर शाळेच्या विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप पटकावली.
लहान गटात कबड्डी मुले आणि मुली, खो-खो लहान गट मुले आणि मुली, रिलेमध्ये मुलगे उपविजेते, मुली विजेते, समुहगीतमध्ये विजेते, मोठा गट कबड्डीमध्ये मुलगे उपविजेते, मुली विजेते, मोठा गट खो-खो मुलगे व मुली विजेते, रिलेमध्ये मुलगे व मुली विजेते, समुहगीत विजेते, समुहनृत्य विजेते, ज्ञानी मी होणारमध्ये लहान गट उपविजेता तर मोठा गट विजेता, वैयक्तिक स्पर्धांमध्ये सई मांजरेकर उंचउडी द्वितीय, 50 मीटर धावणे द्वितीय, आराध्या मांजरेकर 100 मीटर धावणे द्वितीय, गौरव गुडेकर 100 मीटर द्वितीय, तनुष मांजरेकर लांबउडी प्रथम, उंचउडी प्रथम, हर्ष रेडकर 100 मीटर द्वितीय, अलिना जद्दी उंचउडी द्वितीय, 200 मीटर धावणे द्वितीय, करण मांजरेकर 200 मीटर धावणे द्वितीय, कृतीका लांबउडी प्रथम, भावेश कानसे गोळाफेक प्रथम, हरिश्चंद्र गुडेकर लांबउडी प्रथम, उंचउडी प्रथम, उन्नेजा शेख लांबउडी द्वितीय, लावण्या गुडेकर 100 मीटर धावणे प्रथम आदींचा समावेश आहे. यशस्वी विद्याथ्र्यांचे व मार्गदर्शक शिक्षक निरवडेकर, गोठोस्कर, आजगांवकर, राऊळ या सर्वांचे मुख्याध्यापक विजय कदम व केंद्रप्रमुख राजन वारंग यांनी अभिनंदन केले आहे.
फोटोओळी – झाराप – कामळेवीर शाळेच्या मुलांनी विविध स्पर्धेत यश मिळविले.
झाराप – कामळेवीर शाळेने पटकाविली जनरल चॅम्पियनशिप…
