वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे 28 रोजी गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.०८-: नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे रविवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता संस्थेच्या कोरगांवकर सभागृहात स्व.भालचंद्र शंकरराव कर्पे स्मृती गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित आहे.


दोन गटात संपन्न होणा-या या स्पर्धेसाठी 5वी ते 7वीसाठी गीतगायन तर 8वी ते 10वीसाठी नाट¬गीत गायन विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटातील प्रथम पाच विजेत्यांना 250, 200, 150 आणि 100ची दोन बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धकांनी आपली नावे 23 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत मुख्याध्यापक, पालक किंवा विद्याथ्र्यांनी संस्था कार्यालयात पाठवावीत. अधिक माहितीसाठी 8275667090 यावर संपर्क साधावा असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page