वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे 21 रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.०८-: नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे इयत्ता 8वी ते 12वी गटासाठी स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यविर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित आहे. दोन्ही विषयांवरी वक्तृत्व स्पर्धा ह्रा दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता संस्थेच्या सभागृहात घेतल्या जातील.


स्वामी विवेकानंद वक्तृत्व स्पर्धेचे हे चौदावे वर्ष असून यावर्षी “आजही स्वामी विवेकानंदांचे विचार उपयुक्त आहेत?’ यावर दहा मिनिट कालावधीत स्पर्धकांनी आपले विचार मांडावयाचे आहेत. तर स्वातंत्र्यविर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे यंदाचे 11वे वर्ष असून “सामाजिक समरसता दृष्टीकोन’ यावर दहा मिनिट कालावधीत स्पर्धकांनी आपले विचार मांडावयाचे आहेत. दोन्ही स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे 500, 300, 250, 150 व 100 अशी बक्षिसे देण्यात येतील. विद्यालय, महाविद्यालय, पालक यांनी किंवा स्वत: स्पर्धकांनी आपली नावे 17 डिसेंबरपर्यंत संस्था कार्यालयात कळवावीत. अधिक माहितीसाठी 8275667090 यावर संपर्क साधावा असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

You cannot copy content of this page