देऊळवाडा महापुरुष मंदिर वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबरपासून…

⚡मालवण ता.०८-:
मालवण देऊळवाडा येथील श्री महापुरुष मंदिराचा १० वा वर्धापन दिन सोहळा दि. ११ ते १४ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतक कार्यक्रम सादर होणार आहेत.

यामध्ये गुरुवार ११ डिसेंबरला सकाळी ९ वाजता देवाचे मानपान गणेश पूजन, १०.३० वाजता स्थळशुद्धी व कलशशुद्धी, दुपारी १२ वाजता देवस्थापना अग्नी स्थापना, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वाजता दिबदिवी प्रासादिक भजन मंडळ (बुवा प्रणव घाडी) यांचे भजन, रात्री ८ वाजता रामकृष्ण हरि महिला भजन सेवा संघ तेंडोली (बुवा-जुई राऊळ) यांचे भजन, ९ वाजता स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हिरकणी हृदयस्पर्शी एकांकिका, १० वाजता धमाल विनोदी मालवणी एकांकिका ‘आपला ता बायो आणि दुसऱ्याचा ता कारटा’ सादर होणार आहे. शुक्रवार, १२ रोजी सकाळी ९.३० वाजता कलशरोहण, ११ वाजता होमहवन, दुपारी १२ वाजता कलश पूजन, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ६.३० वा. नादब्रघ्म भजन मंडळ, कसाल (बुवा-सुंदर मेस्त्री) यांचे भजन, रात्री ९ वा. दत्तमाऊली दशावतार सिंधुदुर्गचा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग ‘स्वामी अन्नपूर्णा’ होणार आहे.

शनिवार, १३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत रक्तदान शिबीर, सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, रात्री ८ वा. रवळनाथ भजन मंडळ, पिंगुळी (बुवा-रुपेश मयेकर) यांचे भजन, १० वा. जय हनुमान दशावतार मंडळाचा ट्रिकसीनयुक्त नाटक ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ होणार आहे. रविवार, १४ रोजी दुपारी १ ते ३ वाजता ब्राह्मण भोजन, सायंकाळी ७.३० वाजता श्री महापुरुष भजन मंडळ, माड्याचीवाडी कुडाळ (बुवा-ऋषिकेश गावडे) यांचे भजन होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page