बांदा ग्रामस्थांची या मंगळवारी कास श्री वाघबिळकार देवस्थान येथे पदयात्रा…

⚡बांदा ता.०८-: बांदा ग्रामस्थांची पदयात्रा मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी कास येथील श्री वाघबिळकार देवस्थान येथे जाणार आहे असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी कळविले आहे. दुपारी 3 वाजता श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करून पदयात्रेसाठी प्रस्थान करण्यात येणार आहे. भाविकांनी या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क (मो. 98904 46811) साधब्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page