⚡बांदा ता.०७-: नट वाचनालय, बांदा येथे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरांजली कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. सामाजिक सलोखा, न्याय, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकत उपस्थित मान्यवर, ग्रंथालयाचे पदाधिकारी तसेच गावातील नागरिकांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्ष एस आर सावंत यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, सहसचिव हेमंत मोर्ये, मिलिंद महाजन, अभिजित पोरे, श्री देसाई, श्री चांदेकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सुनील नातू आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी आंबेडकरांच्या संविधाननिर्मितीपासून ते सामाजिक क्रांतीपर्यंतच्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे मनन करून शिक्षण, जागरूकता आणि समानतेच्या मूल्यांना अधिक बळ देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
