⚡मालवण ता.०७-: कांदळगाव – कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवालय सभागृहाचा १७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि हरीनाम सप्ताह दि. ९ ते १२ डिसेंबर यां कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.
यानिमित्त ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. विधिवत पूजा, सकाळी १० वा. लघुरुद्र, होम, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी १. ३० महाप्रसाद, दुपारी ३ वा. सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं. 7 वा. स्थानिक भजने, रात्री १० वा. कातवड वाडीतील कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ११ रोजी सकाळी ८ वा. हरीनाम सप्ताह प्रारंभ, १२ रोजी सकाळी ८ वा. हरीनाम सप्ताह समाप्ती, दुपारी २ वा. ब्राह्मण भोजन आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कातवड वाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
