सावंतवाडी ता.०७-:
सावंतवाडी शहरातील कुमार दत्तेय सुनील नाईक याने आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याच्या जोरावर १७ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड होण्याचा मान मिळवला असून सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.
दत्तेयने आतापर्यंत जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि खेळाप्रतीची निष्ठा याची योग्य दखल घेत राष्ट्रीय निवड समितीने त्याची संघासाठी निवड जाहीर केली. या कामगिरीनंतर कुटुंबीय, प्रशिक्षक, मित्रपरिवार तसेच सर्व क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दत्तेयच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत भविष्यासाठी उज्ज्वल यशाची कामना केली आहे.
