जत्रोत्सवाच्या उत्साहात विशाल परब यांचे सपत्नीक देवदर्शन…

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील जागृत देवस्थान श्री देवी कालिका मातेच्या जत्रोत्सवा निमित्त तसेच इन्सुली येथील श्री देवी माऊली पंचायत देवस्थानात श्री. विशाल परब व सौ. वेदिका परब यांनी उपस्थित राहून सपत्नीक दर्शन घेतले.

कारिवडे येथे सध्या जत्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, या मंगलमय वातावरणात विशालजी परब यांनी देवी कालिका मातेचे दर्शन घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. यावेळी सौ. वेदिका परब यांनी देवीची ओटी भरून ग्रामस्थांच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. जत्रेनिमित्त आलेल्या ग्रामस्थांशी व भाविकांशी परब दाम्पत्याने आस्थेने संवाद साधत त्यांच्या कुशलक्षेमाची विचारपूस केली.

यानंतर त्यांनी इन्सुली येथील श्री देवी माऊली पंचायत देवस्थानाला भेट देऊन विधिवत पूजा-अर्चा केली. देवी माऊली चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेताना आत्मिक समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांकडून श्री. विशाल परब व सौ. वेदिका परब यांचे स्वागत करण्यात आले. जत्रा आणि देवस्थाने ही आपली संस्कृती जपण्याची केंद्रे असून, अशा पवित्र स्थळी दर्शन घेण्याचा योग आल्याबद्दल ते ऋणी असल्याचे परब दाम्पत्याने सांगितले.

You cannot copy content of this page