चौके येथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना चहा, बिस्कीट आणि पाणी बॉटल चे वाटप

*शिवसेना चौके आणि उद्योजक बिजेंद्र गावडे यांचा पुढाकार

मालवण (प्रतिनिधी) चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे बुधवारी ४५ वर्षावरील कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पहाटेपासून ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली. जिल्हात सर्वत्र कोविड १९ रोखण्यासाठी कडक निर्बंध म्हणून जिल्हा बंदी असल्याने बाजारपेठतील दुकाने बंद असल्याने लसीकारणासाठी येणाऱ्या लोकांना पाणी व खाद्यपदार्थाची कमतरता भासते. लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थाना शिवसेना चौके व उद्योजक बिजेंद्र गावडे यांच्याकडून चहा बिस्किट, बिसलेरी पाणी बाँटल यांचे वाटप करण्यात आले. यावेळी चौके वैद्यकीय अधिकारी प्रणव पोळ,बिजेंद्र गावडे,मंदार गावडे,उदय गावडे,दिनेश गावडे,निखिल परब,अन्ना गुराम आदि शिवसैनिक उपस्थित होते. ग्रामस्थांनी तसेच आरोग्य केंद्र यांच्यावतीने शिवसेनेच्या या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page