२६/११ हल्ल्यातील शहीदांना कणकवलीत वाहिली श्रद्धांजली…

⚡कणकवली ता.२६-: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवानांना कणकवलीत अभिवादन करण्यात आले. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हल्ल्यातील वीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाणचे, अशोक करंबेळकर, गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, संदीप सावंत, अर्पिता मुंबरकर, दादा कोरडे, संजय मालंडकर, विनायक ( बाळू ) मेस्त्री, रुपेश खाडये, महिला पोलीस प्रणाली जाधव, उज्ज्वला मांजरेकर, विनायक सापळे, सदाशिव राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात अशोक करंबेळकर, प्रा. राजेंद्र मुंबरकर व विनायक मेस्त्री यांनी मनोगत व्यक्त करत हल्ल्यात प्राणार्पण केलेल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. कणकवलीकरांनी मोठ्या आदराने या वीरांना स्मरण केले.

You cannot copy content of this page