⚡सावंतवाडी-:
दादर-माहीम मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे आमदार तसेच सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख महेश सावंत आजपासून सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या आगमनाने ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
थोड्याच वेळात ते सावंतवाडीत दाखल होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक वेग येणार तसेच शिवसेनेला जोरदार बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
