*💫मालवण दि.११-;* मालवण बाजारपेठेतील जुन्या पिढीतील सुवर्णकार राजाराम महादेव पेडणेकर (वय ९६) यांचे निधन झाले. राष्ट्र सेवादलाचे सैनिक आणि बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते, प्रा. शामराव कोचरेकर यांचे सहकारी म्हणून पेडणेकर यांनी काम केले होते. आणीबाणीच्या काळात जुन्या तुरुंगात गेलेल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचविण्यासाठी पेडणेकर यांनी मोठे योगदान दिले होते. बॅ. नाथ पै सेवांगणच्या जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्यावर बाजारपेठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मालवण बाजारपेठेतील आणखी एक जुन्या काळातील व्यापारी दुवा त्यांच्या रुपाने निखळला, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा परिवार आहे. माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर, भार्गव पेडणेकर, भाई पेडणेकर यांचे ते वडील होत.
*ज्येष्ठ सुवर्णकार राजाराम पेडणेकर यांचे निधन
