*बॅ. नाथ पै सेवांगण संस्थेच्या अन्नछत्रास ५ हजाराची आर्थिक मद
*💫मालवण दि.११-:* मालवण नगरपालिकेचे नगरसेवक व बांधकाम सभापती श्री. मंदार केणी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या अन्नछत्र उपक्रमाला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. सेवांगणतर्फे कोरोना रुग्णांना आणि कोरोना योद्धे यांना मोफत जेवण दिले जात आहे. या सामाजिक उपक्रमाला केणी यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मदत केली आहे. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, लक्ष्मिकांत खोबरेकर, अक्षय देसाई आदी उपस्थित होते.
