⚡मालवण ता.१९-:
मालवण मधील दांडी मोरेश्वरवाडी येथे मंगळवारी संध्याकाळी श्रीकृष्ण ढोके यांच्या घराजवळ जाळ्यात अडकलेल्या घोरपडीची युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमेट्सच्या प्राणीमित्र सदस्यांनी सुटका करत जीवदान दिले.
श्रीकृष्ण ढोके यांच्या घराजवळ जाळ्यात अडकलेली घोरपड दिसताच कृष्ण ढोके, पांडुरंग (बाबा) ढोके व किशोर ढोके यांनी घोरपड जाळ्यासकट सुरक्षित ठिकाणी आणून ठेवली. त्यानंतर संतोष ढोके यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट चे सदस्य अक्षय यांच्याशी संपर्क केला. घोरपड जाळ्यात अडकली हे समजताच अक्षय रेवंडकर यांच्यासह इकोमेट्सचे सदस्य भार्गव खराडे व प्रतीक कोचरेकर यांनी त्याठिकाणी धाव घेत त्या घोरपडीला जाळ्यातून सोडवून जीवदान दिले. यानंतर घोरपडीला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले.
