श्रीफळ अर्पण करून भाजपचा प्रचार शुभारंभ…

⚡मालवण ता.१९-: मालवण शहराचा विकास हा माझ्या दृष्टीने केवळ घोषणा आणि आश्वासनांचा विषय नाही तर तो माझ्यासाठी एक जबाबदारी आहे आज मालवणवासीय ज्या काही समस्या अनुभवत आहे त्या दूर करणे हे माझे कर्तव्य समजते मग तो पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा असेल, स्वच्छता, सुंदर रस्ते, महिलांचं संरक्षण आणि त्यांचा मानसन्मान अथवा शैक्षणिक समस्या यावर ठोस उपाय करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीचे एक व्हिजन घेऊन भाजप ही निवडणूक लढवत आहे त्यामुळे नगराध्यक्षसहित नगरसेवक पदाच्या या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना मालवण शहरवासीय मोठ्या मतांनी विजयी करतील असा ठाम विश्वास मालवण नगरपालिका निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांनी येथे बोलताना केले

मालवण येथे आज मालवणची ग्रामदैवते श्री देव रामेश्वर आणि श्री देव नारायण यांच्या मंदिरात भाजपच्या उमेदवारांनी श्रीफळ अर्पण करून आपल्या प्रचाराचा घरोघरी शुभारंभ केला त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला

सौ शिल्पा खोत पुढे म्हणाल्या मालवणचा विकास हे व्हिजन घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. भाजप हा व्हिजनरी असणारा पक्ष आहे. या जोरावरच पुढील दोन ते तीन वर्षात मालवणचे सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.
मालवणची जनता सुज्ञ आहे. मालवणचा विकास हा फक्त आणि फक्त सत्तेवर असणारा भाजपच करू शकतो असे सांगून त्या पुढे म्हणाल्या किनारपट्टी भागापासून मालवणचा मध्यवर्ती भाग व ग्रामीण भागाचा विकास करत विकासासाठी जास्तीस जास्त निधी भाजपच आणून विकासाची वचनपूर्ती भाजपच करू शकेल. जनतेचा प्रतिसाद पाहता विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत. असेही सौ खोत म्हणाल्या

You cannot copy content of this page