⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शनिवारी सहाव्या दिवशी उद्धव सेनेच्या नगराध्यक्षासहीत नगरसेवक पदाचे दहा तर काँग्रेसकडूनएवढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसने जाहीर केलेल्यापैकी विलास गावडे आणि विधाता सावंत यांनी अद्यापपर्यंत अर्ज दाखल केलेला नाही.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला होता. मात्र, गुरूवारपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी अमिता गावडे यांनी आपली एकमेव उमेदवारी दाखल केली होती. आज शनिवारी उद्धव सेनेतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे एकूण १२ उमेदवारी अर्ज भरण्यात आले. यात पूजा सुशिल घाडी (प्रभाग क्र. २ अ), राधिका राजाराम लोणे (प्रभाग क्र. ७ अ), श्रुती श्रीकांत गिरप (प्रभाग क्र. ६ अ), संदेश प्रभाकर निकम (प्रभाग क्र. ८ ब), अक्षय गुरूनाथ जाधव (प्रभाग क्र. ९ अ), अजित सुभाष राऊळ (प्रभाग क्र. ४ ब), संगीता संतोष नाईक (प्रभाग क्र.९ ब), सुमन संदेश निकम (प्रभाग क्र. ८ अ), कोमल कमलाकर सरमळकर (प्रभाग क्र.४ अ), रॅक्स इथोरीन परेरा (प्रभाग क्र. ७ ब), अंकिता अविनाश केरकर (प्रभाक क्र. १० ब) यांचा समावेश आहे.
तर काँग्रेसकडून सत्वशिला विठ्ठल घाटकर (प्रभाग क्र. ३ ब), चेतन चंद्रमोहन कुबल (प्रभाग क्र. ५ ब), महेश सूर्यकांत डिचोलकर (प्रभाग क्र. ६ ब), देविदास रमाकांत आरोलकर (प्रभाग क्र. ३ अ), कृतिका कमलाकांत कुबल (प्रभाग क्र. ५ अ), सतेज पुंडलिक मयेकर (प्रभाग क्र. ८ ब) आणि अमिता सुभाष गावडे (प्रभाग क्र.६ अ) आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच अपक्ष म्हणून नरेंद्र गुरूनाथ नाईक (प्रभाग क्र. ४ ब) यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
दरम्यान, अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टी, शिदे शिवसेना, शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी या पक्षाच्या एकाही उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
