तात्काळ रिक्त पद भरा :ग्रामस्थांची मागणी..
⚡आंबोली,ता.१२-: जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली मध्ये अनेक रिक्त पदे असूनही शासनाकडून कार्यवाही होत नाही. येथील डॉक्टरांना आणि स्टाफ ला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदे रिक्त आहेत.आरोग्य सेवक पदे रिक्त आहेत.नर्स पद रिक्त आहे.शासनाने नियुक्ती पत्र देऊनही हजर झालेले नाहीत.त्यामुळे इतर उपकेंद्र मधील नर्स ला याठिकाणी बोलवावे लागत आहे. दुर्गम भाग,पर्यटन तसेच शहरापासून 30 किलोमीटर परिसर असल्याने आरोग्य केंद्र सक्षम असले पाहिजे.येथे डॉ. महेश जाधव व डॉ. आदिती पाटकर याठिकाणी सेवा देतात. याठिकाणी आरोग्य केंद्रातील समस्या रिक्तपदे तात्काळ भरून सक्षम आरोग्य व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
