कलंबिस्त मध्ये ठाकरे सेना काँग्रेसला शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठा धक्का…

२५० कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश:आमदार दीपक केसरकर, संजू परब यांच्याकडून स्वागत..

⚡सावंतवाडी ता. ०९-:
कलंबिस्त गावातील ठाकरे गटाच्या दोन ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आज आमदार दीपक केसरकर व जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गट तसेच काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने जोरदार मोर्चाबांधणी सुरू केली आहे.

यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, “शिंदे यांच्या शिवसेनेत प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जातो. तुम्हाला योग्य मान मिळेल आणि तुमच्या गावच्या विकासासाठी आमचा पक्ष नेहमी तत्पर राहील,” असा विश्वास त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना दिला.

You cannot copy content of this page