सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांचे आवाहन*
मालवण (प्रतिनिधी) पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्गमधील गावागावात पर्यटन विकासासाठी मोठी संधी असून त्यातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातुन जिल्ह्यातील गावागावातील पर्यटन स्थळांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सर्वसामावेशक समिती बनवून त्याद्वारे गावातील पर्यटन स्थळांचा सर्व्हे करून आपल्या गावची पर्यटन विषयी माहिती महासंघास पाठवावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील गावांमधील पर्यटन विषयक गोष्टी विकसित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्न करत आहे. गावांमधील लोकजीवन, खाद्य संस्कृती, शेती, नद्या, संगम, गड किल्ले आदी गोष्टींमधून पर्यटन साधता येऊ शकते. यासाठी ग्रामपंचायतीनी ७- १० व्यक्तींचा समावेश असणारी समिती गठीत करून गावचा पर्यटन दृष्ट्या सर्व्हे करून माहिती संकलित करावी. ही समिती महासंघास संलग्न करून माहिती महासंघाकडे दहा दिवसांत द्यावी. ग्रामपंचायतींना ई-मेल पाठविमहिती पाठविण्यासाठी ऑनलाईन फॉर्म पाठविला आहे. ही माहिती महासंघाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर (व्हॉट्सअप क्रमांक – ९४०४३४७१९९) यांच्याकडे पाठवावी, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले आहे.
