कोरोनावर मात करून मालवण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत हजर

मालवण दि प्रतिनिधी कोरोनावर मात करत पुन्हा सेवेत हजर झालेल्या मालवण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व भारत फारणे यांचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मालवण भरड नाका येथे सेवा बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून तसेच पोलीस ठाणे येथेही दोघा अधिकाऱ्यांचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. काही दिवसांपूर्वी सेवेत असताना दोघांनाही लक्षणे दिसून येत असल्याने तपासणी केली असता दोघेही कोरोना पॉझिटिव्ह सापडून आले. होम आयसुलेशन व औषधोपचारा नंतर दोघांनीही कोरोनावर मात केली. आयसुलेशन व उपचार कालावधी संपल्यानंतर दोन्ही अधिकारी जनतेच्या सेवेत १७ दिवसांनंतर आजपासून पुन्हा हजर झाले.

You cannot copy content of this page