संदीप पांढरे यांचा ठाकरे शिवसेनेला रामराम…

​सावंतवाडी,ता.०६: ठाकरे शिवसेनेतील गळती काही थांबायला तयार नाही. माजी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा आणि विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांच्यापाठोपाठ आता उपतालुकाप्रमुख संदीप पांढरे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.​पांढरे यांनी आपल्या उपतालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ‘ठाकरे’ शिवसेनेच्या संघटनेत मोठे खिंडार पडले आहे. या राजीनाम्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा असली तरी, पांढरे यांनी अद्याप आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत मौन बाळगले आहे. मात्र, त्यांचे पक्षातून बाहेर पडणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ‘उबाठा’ शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

You cannot copy content of this page