आमदार दीपक केसरकर:आमचा नगराध्यक्ष 24 तास जनसेवेचे काम करणारा असणार..
⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडीकरांच्या मनातला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा दिला जाईल. असे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा 24 तास जनसेवेचे काम करणारा असणार आहे असेही ते म्हणाले. सावंतवाडी वेंगुर्ले मालवण या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असतील असे ते म्हणाले यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते. महायुती बाबत मित्र पक्षांचा निर्णय झाला असेल तर आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल असे ते म्हणाले.
