संजू परब:केसरकरांची ताकद आजही कायम असल्याचा केला दावा..
⚡सावंतवाडी, ता. ०६ :
“मी नगराध्यक्ष झालो ते खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सावंतवाडीची जनता, पाटेकर-उपरलकर यांच्या आशीर्वादामुळेच,” झालो असा टोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी नाव न घेता पालकमंत्री नितेश राणेंवर अप्रत्यक्ष लगावला.
परब म्हणाले की, “केसरकरांची या मतदारसंघात ताकद आजही कायम आहे. २०१९ मध्ये आम्ही राजन तेलींना मदत करून सुद्धा केसरकर हे भरघोस मतांनी निवडून आले, त्यामुळे आमच्यामुळे निवडून आल्या म्हणणाऱ्यांनी कोणीही त्यांची त्यामुळे त्यांची ताकद हे कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळेच सध्याचे आमदार शिंदे गटाच्या तिकिटावर नव्हे, तर महायुतीच्या पाठिंब्यामुळे निवडून आले आहेत,” असा दावा त्यांनी यावेळी केला.
