युवराज लखमराजे भोसले यांची माहिती: संजू परब यांनी विकास कामांबाबत केलेलं विधान महायुती म्हणून चुकीचं; मनोज नाईक..
⚡सावंतवाडी, ता..०४-: शहरातील तब्बल दोन कोटी रुपयांची विकासकामे ही पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याचा दावा भाजप नेते युवराज लखमराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत केला. शहराच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही कामे होत असून यामुळे सावंतवाडीच्या सौंदर्यात भर पडेल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना सुधीर आडिवरेकर म्हणाले, “पालकमंत्र्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले की, जी कामे करायची आहेत त्यांची यादी द्या, निधी आम्ही उपलब्ध करून देतो,” त्यानंतरच ही कामे मंजूर झाली आहेत. त्यामुळे कोणी किती दावा करतो यापेक्षा ही कामे महायुतीच्या माध्यमातून झाली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,मनोज नाईक म्हणाले आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शहरात विकास कामे झाली असल्याचा दावा संजू परब यांनी केलेल विधान चुकीच असून त्यांचे आधीचे विधान आपण तपासावे असा टोला मनोज नाईक यांनी हाणला.तसेच,शहरातील सर्व जागांवर लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. मात्र वरच्या स्तरावर काय निर्णय घेतला जाईल, त्यानुसार आमची पुढील भूमिका ठरेल,” असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस उदय नाईक, मनोज नाईक, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, केतन आजगावकर, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, आदी उपस्थित होते.
