⚡मालवण ता.०४-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे सुपुत्र आसिम सादिक मेमन यांनी सि. ए. च्या परीक्षेत कोल्हापूर शहर केंद्रात प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. आसीम सादीक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून मालवणच्या भारत जनरल स्टोअर्सचे मालक व ज्येष्ठ व्यापारी सादीक दादापे मेमन यांचे चिरंजीव तर मसूद दादापे मेमन यांचे पुतणे आहेत. २३ वर्षीय आसीम मेमन यांच्या या यशाबद्दल त्यांची विशेष प्रशंसा होत असून त्यांच्या आजी खैरुन्नीसा मेमन, वडिल सादीक मेमन, आई रुख़साना मेमन आणि काका व मालवणचे ज्येष्ठ व्यापारी मसूद मेमन, काकू शहनाझ मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया तर्फे म्हणजेच आय सी ए आय तर्फे घेण्यात आलेल्या सि. ए. परीक्षेत कोल्हापूर केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या आसिम सादिक मेमन यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आसिम सादिक मेमन यांनी त्यांच्या आजी व मालवणच्या ज्येष्ठ नागरीक खैरुन्नीसा मेमन यांच्या शैक्षणिक जाणिवांना न्याय द्यायचा प्रयत्न असतो असे सांगितले असून त्यांनी त्यांचे वडिल सादिक मेमन, काका मसूद मेमन आणि टोपीवाला हायस्कूल मालवणचे मान्यवर शिक्षक, विवेकानंद महाविद्यालय , कोल्हापूर येथील प्राध्यापक तसेच सर्व मार्गदर्शक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
