रवि जाधव :प्रत्येक घरासमोर पाच पणत्या लावण्याचे आवाहन..
⚡सावंतवाडी, ता.४-:
त्रिपुरा पौर्णिमेच्या शुभप्रसंगी यंदा सावंतवाडी शहरामध्ये मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवि जाधव यांनी केले आहे. शहरातील प्रत्येक नागरिक व कुटुंबामध्ये सुख-शांती नांदावी, प्रत्येकाचे आयुष्य दिव्य ज्योतीप्रमाणे उज्वल व्हावे, या मंगल भावनेतून हा उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचं जाधव यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून शहरात दीपोत्सवाची ही परंपरा सुरू झाली होती. या परंपरेला अखंडपणे पुढे नेण्यासाठी उद्या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर तसेच जवळच्या मंदिरात किमान पाच पणत्या लावाव्यात, असे नम्र आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
