प्रशासनाने अतिरिक्त कागदपत्रांची अट न लावता ‘फार्मर आयडी’च्या आधारे नुकसान भरपाई द्यावी;गुणाजी गावडे यांची मागणी..
⚡सावंतवाडी, ता. ३१-:
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. मात्र या प्रक्रियेत शेतकऱ्यांकडे विविध कागदपत्रांची मागणी केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने अतिरिक्त कागदपत्रांची अट न लावता ‘फार्मर आयडी’च्या आधारेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे युवा नेते व वेत्ये ग्रामपंचायतीचे सरपंच गुणाजी गावडे यांनी केली आहे.
यासंदर्भात गावडे यांनी तहसीलदार यांचे लक्ष वेधल आहे. त्यांनी म्हटले आहे की, “सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कोणताही त्रास न देता फार्मर आयडीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.”गावडे यांनी प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
