तरांदळे कुंदेवाडी ते सावडाव खलांतरवाडी रस्ता भूमीपूजन सोहळा संपन्न…

खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते भूमीपूजन..

कणकवली : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत तरांदळे कुंदेवाडी ते सावडाव खलांतरवाडी या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन शनिवारी खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या सोहळ्यास स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.

यावेळी बोलताना खासदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली तालुक्यात विविध विकासकामे यापुढेही सुरू राहतील. ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या कामामागचा प्रमुख उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे राबविली जात आहेत. नागरिकांनीही सहकार्य दिल्यास आणखी गतीने विकासकामे पुढे नेता येतील. शालेय मुलांना, नागरिकांना नेहेमी होणारी गैरसोय या निमित्ताने दूर होणार आहे. आपली आर्थिक उन्नती साधण्यासाठी या मार्गाचा उपयोग होऊ शकतो.

यावेळी संतोष कानडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, हेमंत परूळेकर, पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता भोसले, सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे, कणकवली भाजप तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, शक्तीकेंद्र प्रमुख राजू हिरलेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य परशुराम झगडे, ओटव सरपंच रुहिता तांबे, भरणी सरपंच अनिल बागवे, तरंदळे सरपंच सुशील कदम, जाणवली सरपंच अजित पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे, प्रस्तावना हेमंत परुळेकर, आभार परशुराम झगडे यांनी मानले.

You cannot copy content of this page