रियाज खान यांच्या जाण्याने संघटनेवर काही परिणाम नाही…

ओंकार नाडकर्णी:युवासेनेत अधिकृत पद नसल्याची केली स्पष्टोक्ती..

⚡बांदा ता.२६-: “रियाज खान यांच्या पक्षबदलाने आम्हाला कोणताही फरक पडत नाही. युवासेनेत त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नव्हते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे बांदा उपविभागप्रमुख ओंकार नाडकर्णी यांनी दिली आहे.

नाडकर्णी पुढे म्हणाले, “सध्या युवासेना शहरप्रमुखपदी राजदीप पावसकर कार्यरत आहेत. काहीजण स्वतःला युवासेनाचे पदाधिकारी म्हणून खोटी पदे दाखवत आहेत, हे चुकीचे आहे. कृपया अशी दिशाभूल त्यांनी करू नये. “रियाज खान यांनी पक्षबदल केला ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांनी त्यांच्या घरी सुखाने राहावे, त्यांना आमच्या शुभेच्छा,” असे नाडकर्णी यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यानंतर युवासेनेतील गोंधळावर पडदा पडला असून स्थानिक पातळीवर या घडामोडीची चर्चा रंगली आहे.
रियाज खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश केला होता.
फोटो
ओंकार नाडकर्णी.

You cannot copy content of this page