जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत देवबाग हायस्कुलचा ओमकार कुमठेकर प्रथम…

⚡मालवण ता.१८-:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग या प्रशालेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओमकार धनंजय कुमठेकर याने बालगटातून थाळीफेक या क्रीडा प्रकारामध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून तो विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे. तसेच ओमकार याने जिल्हास्तरीय गोळा फेक स्पर्धेतही तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

सदर स्पर्धे दरम्यान क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत ओमकार कुमठेकर याला गौरविण्यात आले. ओमकार यास शिक्षक श्री.बांगारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ओमकार व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी आणि सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page