सावंतवाडी – भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सावंतवाडी तालुक्यात आत्मनिर्भर भारत या अभियानाची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत आत्मनिर्भर भारत अभियानाचे संयोजक श्री. रवींद्र मडगावकर प्रमुख उपस्थित होते.
तसेच शहर मंडल अध्यक्ष श्री. सुधीर आडीवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष श्री. स्वागत नाटेकर, आंबोली मंडल अध्यक्ष श्री. संतोष राऊळ, सावंतवाडी शहर मंडलचे सरचिटणीस व अभियान संयोजक श्री. संजीव शिरोडकर, आंबोली मंडल सरचिटणीस श्री. बाळू शिरसाठ, शहर मंडल सरचिटणीस श्री. दिलीप भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ. दिपाली भालेकर, आंबोली मंडल महिला अध्यक्षा सौ. प्राजक्ता केळुस्कर यांची उपस्थिती लाभली.
कार्यशाळेत जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. अजय गोंधावळे, मळेवाड सरपंच हेमंत मराठे, सांगेली सरपंच श्री. लवू भिंगारे, अँड. श्री. सिध्दार्थ भांबूरे, माजी नगरसेविका सौ. अन्नपुर्णा कोरगांवकर, श्री. गोपाळ नाईक, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते, हितेन नाईक, शक्तीकेंद्र प्रमुख अमित गवंडळकर, बुथ अध्यक्ष सागर सावंत, नागेश जगताप, सेबिस्तिन फर्नाडिस, विजू साटेलकर, ज्योती मुद्राळे, धिरेंद्र म्हापसेकर, राजन राऊळ, भाऊ कोळमेकर तसेच तालुक्यातील सर्व बूथ अध्यक्ष आणि शक्तिकेंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान आत्मनिर्भर भारत अभियानाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना जनजागृतीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
