मालवण वायरी गर्देरोड येथील जीवनकला मोंडकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१४-:
मालवण वायरी गर्देरोड येथील मूळ रहिवासी आणि ठाणे दिवा येथे राहणाऱ्या श्रीमती जीवनकला शिवलिंग मोंडकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दिवा येथील राहत्या घरी निधन झाले.

श्रीमती जीवनकला शिवलिंग मोंडकर या परोपकारी वृत्तीच्या असल्याने त्या लोकप्रिय होत्या. त्यांच्यावर दिवा येथील स्मशान भूमीत अंत्यसंकार करण्यात आले. मुंबई पोलीस विभागातील कार्यालय अधिक्षक सौ. अस्मिता अरुण परब यांच्या तसेच सेलो कंपनीचे महाराष्ट्र राज्य हेड मॅनेजिंग डायरेकटर दिनेश मोंडकर आणि मालवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक सौ. वर्षा पराडकर यांच्या त्या मातोश्री होत तर मंत्रालयातील वित्त विभागाचे सेवानिवृत्त सहसचिव श्री. अरुण वसंत परब यांच्या तसेच मांडखोल चौके मालवण येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नारायण पराडकर यांच्या त्या सासूबाई होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे

You cannot copy content of this page