⚡सावंतवाडी, ता. १५-:
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालजी परब यांचा वाढदिवस बुधवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. यंदाचा वाढदिवस पारंपरिक उत्साहात न साजरा करता, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
‘वाढदिवस एक नवा संस्कार, सामाजिक बांधीलकीतून करू समाजाचा विचार, देवू मदतीचा हात, ठेवू सामाजिक भान’ या संकल्पनेनुसार या दिवशी सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विशालजी परब हे सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान सावंतवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांना हार, पुष्पगुच्छ, केक किंवा भेटवस्तू देण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करताना विशालजींनी नागरिकांना थेट शुभेच्छा देण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
