आमदार निलेश राणे: ठाकरे शिवसेनेतील शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश..
मालवण दि प्रतिनिधी :
आगामी जिल्हापरिषद पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणूक महत्वाच्या आहेत. भगवा गावात आणि घराघरात पोहचला पाहिजे. सर्वत्र भगवा फडकला पाहिजे. ही निवडणुक तुमच्या पुढील 25 वर्षे अस्तित्वाची आहे. त्या दृष्टीने तयारी करा. विकास कामांची जबाबदारी आमची. तुम्ही जनतेला देणार तो विकासकामांचा शब्द पुर्ण करण्याची जबाबदारी आमची. असे प्रतिपादन मालवणचे आमदार निलेश राणे यांनी येथे बोलताना केले
पोईप येथील ठाकरे युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, माजी सरपंच शिवरामपंत पालव यांसह पोईप जिप मतदारसंघातील शेकडो उबाठा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, अनिल कांदळकर, राजा गावडे, दिपक नारकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, संतोष साटविलकर, राजन माणगांवकर, सरपंच श्रीधर नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवासेना तालुकाप्रमुख अभि गावडे, स्वप्नील गावडे, अनिकेत तेंडोलकर, सागर वालावलकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, उपतालुका प्रमुख विजय चव्हाण, अरुण तोडणकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, भाऊ चव्हाण, छोटू ठाकूर, पिंट्या गांवकर, विभागप्रमुख कमलेश प्रभू, बाबू परब, राजू बिडये, मंदार लुडबे, प्रदीप माने, पपू वराडकर, बाळा पालव, स्वरूप वाळके, राहुल बागवे यांसह अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी माझी दुसरी इनिंग खासदार नारायण राणे यांच्या मतदारसंघातून झाली हे देवाचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित शिवसेना पक्ष संघटना वाढवत असताना राणे साहेबांचा मतदार संघ आणि खासदार राणे यांची माणसे जपणे हे माझे कर्तव्य आहे. दहा वर्षे मागे पडलेल्या या मतदार संघाचा आणि जनतेला अपेक्षित विकास हेच माझे लक्ष आहे. आमदार म्हणून सुमारे 200 कोटी पेक्षा जास्त विकासनिधी आगामी काळात या मतदारसंघात आणणार. त्या सोबत जिल्हा नियोजन, राज्य सरकार, केंद्र सरकार या माध्यमातून मोठा निधी येतोय. यापुढे येत राहील. शेकडो कोटी विकासनिधीच्या माध्यमातून गावागावात जनतेच्या मागणीनुसार विकास होईल. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन स्पष्ट केले.
यावेळी राणे पुढे म्हणाले उबाठातुन अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होत आहेत. दहा महिन्यात दहा ते बारा हजार एकूण संख्येने प्रवेश झाले. यात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त काम जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आहे. त्यांचा शब्द कधी पडू देणार नाही. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी दत्ता सामंत यांच्या कामाचेही भरभरून कौतुक केले.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहे : दत्ता सामंत
जे येतील त्या सर्वांचे पक्षात स्वागत. सगळ्यांना एकत्र घेऊन जोमाने एकसंघ शिवसेना संघटना वाढत आहे. राणे साहेबांनी 1990 मध्ये जशी शिवसेना वाढवली तशी शिवसेना आमदार निलेश राणे वाढवत आहेत. विकास गतिमान आहे. ग्रामस्थ सुचवतील ती कामे मंजूर करून गांव विकासाची जबाबदारी आमची. पक्ष प्रवेशांचे श्रेय आमदार निलेश राणे यांचेच आहे. त्यांच्या कार्यावर प्रेरित होऊन शिवसेना वाढत आहे. एक कुटुंब म्हणून ते सर्वाना सोबत घेऊन पुढे जात आहेत. असे सांगत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या संघटना वाढ व विकास
कार्याचे कौतुक केले. सोबत माजी जिप सभापती अनिल कांदळकर, शिवसेना शाखा प्रमुख नारायण राणे यांच्या सेवाभावी कामाचेही दत्ता सामंत यांनी विशेष कौतुक केले. तसेच पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्यासह मान्यवरांचि भाषणे झाली
