जिल्हा परिषदेत दिवाळी निमित्त खाद्य पदार्थ विक्री प्रदर्शन…

सिंधुदुर्गनगरी ता १०
दिवाळी सणा निमित्त आवश्यक खाद्यपदार्थ व वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन जिल्हा परिषद परिसरामध्ये १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील कार्यरत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालास स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने तसेच स्वयं सहाय्यता समूहांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दीपावली सणाचे अवचित साधून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व उमेद अभियानामार्फत दीपावली सणाकरिता आवश्यक साहित्य, आकाश कंदील, फराळ, मिठाई व विविध वस्तूंच्या विक्रीचे प्रदर्शन १३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कार्यालयाच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.या प्रदर्शनाला भेट देऊन तसेच खाद्यपदार्थ खरेदी करून बचतगटाना प्रोत्साहन द्यावे . जिल्हा परिषद प्रशासनाने आवाहन केले आहे .

You cannot copy content of this page