कामाचा ठिकाणी स्त्री पुरुष न मानता सहकारी मानले पाहिजे-“न्या. स्वाती पाटील…

ओरोस ता १०
जोवर आपल्या समाजात स्त्री पुरुष समानतेची कल्पना पूर्णपणे रुजत नाही. स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून ती व्यक्ती आहे. याचे भान समाजाला येत नाही तोवर, लाइगिक छळ सारख्या समस्या निर्माण होत राहणार. त्यासाठी योग्य त्या कायदेशीर तरतुदी, समित्या या सर्व बाबी महत्वाच्या आहेत, पण मनाची नैतीकता देखील तेवढीच महत्वाची आहे. पण सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे स्त्री पुरुषांनी सहकारी म्हणून एकमेकांसोबत सहकार्याने काम करणे हे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे तिसरे सह दिवाणी न्यायाधीश, (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वाती पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ २०१३ कार्यक्रमात बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशा अन्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्यावतीने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ २०१३ हा कार्यक्रम ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन येथे आयोजित करणेत आला होता. यावेळी न्यायाधीश श्रीमती पाटील बोलत होत्या. यावेळी सिंधुदुर्ग डाक विभाग अधीक्षक एन. टी. कुरलपकर, सहायक अधीक्षक व्हि. जी. गिरकर, सहाय्यक लोकअभिरक्षक ॲड. रुचा लोखंडे, तसेच सिंधुदुर्ग डाक विभागामधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना न्यायाधीश श्रीमती पाटील यांनी महिला आता मुलगी, सुन, पत्नी, माता या चौकटित न राहता स्वावलंबी बनत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, वैमानिक, न्यायाधिश, शिक्षक अशा विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी हि चमक आपल्या कतृत्वाने दाखवली आहे. थोर समाजसुधारकांनी स्त्रीपुरुष समानतेची चळवळ उभी केली त्याला काही अंशी यश आल्याचे दिसून येत आहे, असे सांगितले. यावेळी अधिवक्ता ॲड. रुचा लोखंडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ कायदा २०१३ याबाबत बोलताना अंतर्गत समितीची भूमिका, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया (३ महिन्यांच्या आत) आणि लैंगिक छळाचे प्रक्रार समजावून सांगत कायदा अंतर्गत समितीच्या सदस्यांनी या कायद्याची गंभीरता समजून घेऊन प्रत्येक तक्रारीकडे संवेदनशीलतेने व कायदेशीर दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. महिलांनी या कायद्याचा गैरवापर न करता आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी याचा योग्य उपयोग करावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यालय सहाय्यक श्रीमती श्वेता मुसळे, यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.

फोटो ओळ : सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page