मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित झोप, योग्य आहार गरजेचा-:डॉ संदीप खुडे…

ओरोस ता १०
मानसिक आरोग्य चांगले असेल तर आपल्याला चांगले आयुष्य जगता येते. शारीरिक हालचाली ही एक नैसर्गिक ताणतणाव कमी करणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपण नियमित व्यायाम केले पाहिजेत. व्यायामामुळे आपल्या मेंदूवरील ताण कमी होतो. तसेच नियमित झोप व योग्य आहार घेतला पाहिजे. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य चांगले राहते, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ. संदिप खुडे यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिन कार्यक्रमात बोलताना केले.
महाराष्ट्र राज्‍य विधी सेवा प्राध‍िकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशा अन्वये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग डॉ. सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिन जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे साजरा करणेत आले. यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ. कौस्तुभ लेले, मानसोपचार तज्ञ, मा. डॉ. संदिप खुडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. तेजल जगताप वैद्यकिय अधिकारी डॉ. समाधान मुळे, लोक अभिरक्षक ॲड. सुर्याजी खुने तसेच इतर वैद्यकिय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मानसोपचार तज्ञ डॉ. कौस्तुभ लेले यांनी उपस्थितांना मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मानसिक आरोग्याच्या समर्थनार्थ प्रयत्नांना चालना देण्यासाठी दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो, असे सांगत मानसिक आरोग्य कसे राखावे याबाबत मार्गदर्शन केले. ॲड. सुर्याजी खुने यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविले जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. डॉ. रेश्मा भाईप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले.

फोटो ओळ: सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page