⚡बांदा ता.१०-: आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी व स्थानिक पातळीवर निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस व जिल्हा निरीक्षक मा. संदीप दळवी व जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, दोडामार्ग तालुका अध्यक्ष विनायक सावंत, सावंतवाडी शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर, बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी केले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी ,दोडामार्ग तालुक्यात मनसेच्या बैठकांचे आयोजन…
