ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्थेतर्फे आध्यात्मिक सत्संग सोहळा…

११, १२ ऑक्टोबर २०२५?रोजी बावळाट फौजदारवाडी, सावंतवाडी येथे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१०-:
ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्था (महा. र. नं. एफ १७९८) यांची वतीने परम संतांच्या वाणीवर आध्यात्मिक सत्संग सोहळा (भंडारा) उद्या दि. ११ आणि १२ ऑक्टोबर २०२५ रोजी बावळाट (फौजदारवाडी, ता. सावंतवाडी) च्या वतीने आयोजित केला आहे. हा सत्संग सोहळा आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आहे. त्यानुसार, उद्या ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वा. भक्ती गीते आणि भजने, स. ११ ते दु. १२.३० संतवाणीवर प्रवचन, दु. १२.३० ते १ संत दर्शन आणि कृपाप्रसाद, दु. १ ते २.३० महाप्रसाद होईल.
तर रविवार (१२ ऑक्टोबर) रोजी सकाळी १० ते ११ भक्ती गीत आणि भजने, स. ११ ते दुपारी १२.३० श्री संत सद्गुरू आनंदी गुरुजींचे आध्यात्मिक प्रवचन, दुपारी १२.३० १ संतदर्शन आणि कृपाप्रसाद आणि दुपारी १ ते २.३० महाप्रसाद होईल. याचा सर्व सदभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page