Headlines

आमचा भर विकासात्मक कामांवर राहणार…

राजन तेली: मला कुठलेही नोटीस आलेली नाही, माझं म्हणणं मी वरिष्ठांपर्यंत पोचलो,त्यामुळे हा विषय आता इथे संपला..

⚡सावंतवाडी ता.१०-: आगामी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही संपूर्ण तयारीत आहोत आणि ही निवडणूक निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे. विकासात्मक कामांवर आमचा मुख्य भर राहणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.

तेली म्हणाले की, “उबाठा शिवसेनेतून आमच्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्याचा आमचा उद्देश आहे.”
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या विषयावर बोलताना राजन तेली यांनी स्पष्ट केले की, “नारायण राणे यांनी या बँकेचं नेतृत्व केलं आहे आणि मला देखील या बँकेबद्दल आपुलकी आहे. मला कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. जी नोटीस आली होती, तिचं उत्तर मी आधीच दिलं आहे.”पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा बँकेवरील टीकेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरण योग्य पातळीवर नेण्यात आलं आहे आणि सर्व बाबींची योग्य ती माहिती देण्यात आली आहे. असेही राजन तेली यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

You cannot copy content of this page