…यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार

आमदार निलेश राणे:जिल्ह्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार..

⚡सावंतवाडी ता.१०-: माजी मुख्यमंत्री, खास. नारायण राणेंचे राईट हॅण्ड माजी आम. राजन तेली आता माझ्या ‘लेफ्ट हॅण्डला’ आहेत. मुख्य नेते, एकनाथ शिंदे यांनी मला कपाळी गुलाल लावून जिंकवल आहे‌. माझ्या अपेक्षा कोणत्याही नाहीत. त्यामुळे यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असल्याचे विधान शिवसेना नेते, आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच अधिवेशनात मांडलेल्या आरोग्य प्रश्न व महावितरण समस्यांबाबत थेट संबंधित खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत‌. ही सगळी काम मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री. राणे म्हणाले, दसरा मेळाव्यात माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमच्या कुटुंबात ते परत आलेत. त्यांचा प्रशासकीय अनुभव चांगला आहे. पक्ष वेगळे असताना देखील आम्ही नातं तुटू दिल नाही. पक्षाच्या निष्ठेसाठी एकमेकांच्या विरोधातही लढलो. माझा लहानपणापासून श्री.तेली यांना पहात आलोय. मोठा अनुभव त्यांना आहे. विधानपरिषदेतील त्यांच काम जवळून बघितल आहे. राजन तेलींच्या प्रवेशाचा फायदा शिवसेनेला होणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक पक्षप्रवेश शिवसेनेत होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लोकमान्य काम केली. त्याचा फायदा आम्हाला होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सढळ हस्ते त्यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद ही कशी लढवायची हे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत. खासदार नारायण राणे त्याबाबत निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व समस्या दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच केसरकर आणि तेली यांनी पातळी सोडून टीका केली नाही. एकमेकांबाबतच वैमनस्य मी ऐकलं नाही. काल दोघांची तासभर चर्चा झाली. या विषयात दीपक केसरकर समाधानी आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे, कट्टर विरोधक असं नाही. यापेक्षा अधिक चांगले संबंध दोघांचे दिसतील, आमचा विषय पक्ष वाढविण्याचा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

तसेच खास. नारायण राणेंचे राईट हॅण्ड असणारे राजन तेली आता माझ्या लेफ्ट हॅण्डला आहेत. एकनाथ शिंदे यांनी मला कपाळी गुलाल लावून जिंकवल आहे‌. त्यामुळे यापुढे शिवसेना वाढविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. तर दीपक केसरकर यांना संधी द्यावी ही आमचीही मागणी आहे‌. वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील. दरम्यान, विधानसभेतील लक्षवेधी बाबत विचारलं असता ते म्हणाले, महावितरण खात मुख्यमंत्री यांच्याकडे आहे. राज्यमंत्री यांच्यासह कोकणातील आमदारांची बैठक झाली. समस्यांबाबत आम्ही लक्ष वेधल असून खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत‌. समस्यांचे वर्गीकरण करून कामाला प्रारंभ झाला आहे. ही काम मान्य होत आहेत. तर आरोग्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच उर्वरीत बांधकाम सुरू झालं आहे‌. काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वाढवीले आहेत. तेथील व्यवस्थापन होत आहे. सगळी काम मार्गी लागतील असा विश्वास आम. निलेश राणे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page