लायन्स क्लबतर्फे कोळंब कातवड शाळेतील मुलांना दप्तर वाटप…

⚡मालवण ता.१०-:
कोळंब कातवड शाळेतील १६ गरजू मुलांना शाळेच्या मागणीनुसार लायन्स क्लब मालवणच्या वतीने आणि लायन्स सदस्य सहदेव बापर्डेकर यांच्या दातृत्वातून दप्तर वाटप करण्यात आले.

या दप्तर वाटप प्रसंगी लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, लायन्स क्लब सदस्य रुझारिओ पिंटो, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, ऋग्वेदा धामापूरकर आदी तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page