बांदा केंद्रशाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रं शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ नागरिक अन्वर खान, शंकर नार्वेकर, शामकांत काणेकर ,उपसरपंच आबा धारगळकर ,अरूण मोर्ये , महादेव वसकर, उमांगी मयेकर,भक्ती मुळीक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जून्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेसाठी सदस्य निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी केले.प्रास्ताविक जे.डी.पाटील यांनी केले तर आभार उदय सावळ यांनी मानले‌. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो:-
बांदा केंद्रशाळेत आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करताना सरपंच प्रियांका नाईक. सोबत इतर मान्यवर.

You cannot copy content of this page